पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राव्दारे केली मागणी.
Bhairav Diwase. June 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- विदर्भात मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरीता कृषी केंद्रातुन खरेदी केलेल्या सोयाबीन बियानाची पेरणी केली असता सदर बियाने निकृष्ठ दर्जाचे असल्याने उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पूढील पेरणी करीता नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर* यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राव्दारे केली.
लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे शेतमाल खरेदीविना पडुन आहेत अनेकांनी कमी भावात खजगी व्यापाऱ्यांना शेतमाल विकुन, उधार, उसनवाडी करून किंवा कर्ज घेऊन सोयाबिनची पेरणी केलेली होती परंतू निकृष्ठ बियानामुळे या सर्व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी आली असल्याने शेतकरी हवालदील झाला असुन त्यांना पूढील पेरणीकरीता शासनाने मदत करण्याची गरज आहे. याकरीता अशा पिडीत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून तातडीने त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहीजे तरच त्यांना खरीप हंगामात पेरणी करता येने शक्य आहे. शेतकऱ्यांच्या निकृष्ठ बियानामुळे झालेल्या फसवणाुकीची चैकशी करावी आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी असे अहीर यांनी सांगीतले.