सखोल चौकशीचे अभियंत्यांना आदेश.
Bhairav Diwase. June 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील मानकापूर येथील बंधाऱ्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी केली होती त्यानुसार उप अभियंता ननावरे यांनी कामाची चौकशी केली पण काहीच कारवाई न झाल्याने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहे
सावली तालुक्यातील मानकापूर व चारगाव येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी व पाणी जमिनीत मुरावे यासाठी नाल्यावर सिमेंट प्लग बंधारा बांधकाम जिल्हा परिषद जलसंधारण लघू सिंचाई विभागामार्फत ग्रामीण मजूर सहकारी संस्था भद्रावती यांना प्रत्येकी 13 लक्ष रुपये किंमतीचे काम मिळाले मात्र प्रत्यक्षात काम त्या भागातील पदाधिकाऱ्याचे नातेवाईकाने केले. बांधकामाचेटसाठी ४० एमएम तर आर सी सी साठी 20 एम एम गिट्टीचा वापर आहे परंतु जास्तीत जास्त40 एम एम गिट्टीचा वापर करण्यात आलेला आहे, पूर्ण क्रांक्रीट न करता मधोमध माती रेती भरलेल्या बॅगनी क्रांक्रीट पूर्ण करण्यात आलेला आहे. बांधकामासाठी १० फूट खोदकाम पोकलन मशिनद्वारे करण्यात आले परंतु दुसऱ्याच दिवशी जोराचा पाऊस आल्याने खोदकाम जैसे ते झाले त्याच्यावरच बंधाऱ्यांची पायाभरणी करण्यात आली, लोहा 3 फुटाचे तुकडे वापरून अत्यंत कमी वापर करण्यात आला अशी माहिती गावकऱ्यांकडून पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांना मिळाली होती. पाहणी अंती बंधारा बांधकाम बोगस झाल्याचे आढळल्याने कोरेवार यांनी चौकशीचे निर्देश दिले. उप अभियंता ननावरे, कनिष्ठ अभियंता गंधे यांनी चौकशी केली यादरम्यान निकृष्ट कामास निस्तारण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू होते. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने तहसिल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत हे प्रकरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे लक्षात आणून दिली. याची दखल घेत मानकापूर व चारगाव येथील बंधाऱ्यांची सखोल चौकशीचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.