कर्जबाजारीला कंटाळून केली आत्महत्या.
दोन लाखाचे होते कर्ज.
Bhairav Diwase. June 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
राजुरा:- देशात कोरोना चे संकट असून राजुरा तालुक्यात सीसीआय ची खरेदी संथ गतीने सुरू होती.त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस कवडीमोल भावात खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यावर कर्जाचे डोंगर कोसळले. राजुरा तालुक्यात एका पाठोपाठ एक शेतकरी आत्महत्या करतांना बघायला मिळत आहे. अशीच एक घटना राजुरा तालुक्यातील सोंडो गावातील निलेश बबन वडस्कर वय अंदाजे २८ वर्ष तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. या तरुण शेतकऱ्याला अंदाजे ७ एकर शेती असून त्यावर २ लाख रुपयाचे कर्ज असल्याची माहिती आहे.