मृत महिलेच नाव सपना गुणाजी येलमुले.
Bhairav Diwase. June 17, 2020
सावली:- सावली तालुक्यातील कवठी येथे घरकाम करीत असताना (दि.15) ला सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत महिलेच नाव सपना गुणाजी येलमुले (वय 38) आहे.
सदर महिलेचे माहेर आणि सासर कवठी असून ती नेहमी आपल्या आई कडे जाऊन काम करीत असायची. आई आजारी असल्याने ती दहा ते पंधरा दिवसापूर्वी आई कडे आली होती. शेती चे कामे सांभाळून ती आपल्या संसाराचा गाळा चालवत होती. काम करीत असतांना अचानक तिला सर्प दंश झाला. तिला तात्काळ सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत माळली. तिच्या पश्चात आई, वडील, पती, मुलगा असा आप्त परिवार असून गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.