Click Here...👇👇👇

वाघाने केला जनावराच्या कळपावर हल्ला, गायी व म्हैस ठार.

Bhairav Diwase
सावली तालुक्यातील मेहा बूज येथील घटना.
Bhairav Diwase.   June 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील मेहा बूज येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात  गायी व एक म्हैस ठार तर गंभीर जखमी केलेली घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली.मेहा बुज येथील शेतकऱ्यांची जनावरे गुराखी मनोहर लाकडे दररोज प्रमाणे जंगलाच्या शेजारी चराई साठी घेऊन गेले असता या जनावरांचा कळपावर अचानक दोन वाघांनी हल्ला केल्याने त्यात चार जनावरे ठार झालेली असून एक जखमी केलेला गोरा घरी आणल्यानंतर मरण पावला. वाघांच्या या हल्ल्यामुळे जनावरे इतरत्र पळून गेले आहे.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गुराखी घाबरून गावाकडे आरडा ओरड करीत धाव धरुन सदर घटनेची माहिती गावात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यानी घटनास्थळी धाव धरले. या वाघांच्या हल्ल्यामध्ये मेहा बूज येथील सुरेश गंडाटे यांची म्हैस,महेंद्र ठाकरे(गाय व गोरा), प्रकाश कोलते(गाय), राजेंद्र कोलते यांची गाय अशी एकूण ५ जनावरे ठार झालेली आहेत. जंगल शिवारात ४ जनावरे ठार झाली तर १ जनावर घरी आनल्यानंतर ठार झालेला आहे. या घटनेची माहिती वनविकास महामंडळ च्या पाथरी विभागाला देण्यात आली.घटना पाथरी वनविकास महा मंडळ गट क्र १६० मध्ये घडली असून सदर विभागा तर्फे पंचनामा करण्यात येत आहे. या परिसरामध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी ते डोकेदुखी ठरत असल्याचे दिसत आहे.या घटनेमुळे जनावराचा कळप सैरावैरा होऊन गेल्यामुळे अजूनही जनावरे घरी परतली नाहीत. त्यामुळे गावातील नागरिक जनावरांचा शोध घेत आहेत.