प्रा. आ. केंद्र मारोडा येथे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन उपलब्ध अॅटोमेटीक सॅनिटयझर मशीनचे लोकार्पण.

जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे शुभहस्ते उद्घाटन.
Bhairav Diwase.   June 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- दि. ३० जून. दिवसेंदिवस कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव आणि जिल्ह्यात वाढत चाललेली रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रांत व ग्रामीण रूग्‍णालयांत ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन बसवून त्यामाध्‍यमातुन नागरिकांना आरोग्‍य कवच प्रदान करण्‍याचा संकल्प क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. त्यानुसार आज विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रांत आणि ग्रामीण रूग्‍णालयांत ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन बसविण्यात येऊन त्यांचे ठिकठिकाणी उद्घाटन पार पडले. 
यामध्ये मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात बसविलेल्या अॅटोमेटीक सॅनिटयझर मशीनचे उद्घाटन आज सकाळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे शुभहस्ते पार पडले. तसेच यावेळी उपस्थितांना आर्सेनिक अल्बम -30 या होमिओपॅथीक गोळ्यांसह माॅस्क, साबण व बिस्किट, इत्यादींचे वाटप करण्यात आले. 
याप्रसंगी त्यांसमवेत, मुल नगरपरिषदेचे नगरसेवक अजय गोगुलवार, बबनजी पानगंटीवार, प्रेमदासजी गेडाम, बंडू नर्मलवार, सचिन गुरनुले, नरसिंग गणवेणवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. झाडे, डॉ. वैद्य, आरोग्य सहाय्यक सोयाम, दहीवले तसेच आरोग्य सेविका, कर्मचारी आदिंसह अनेक मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने