भारतीय जनता युवा मोर्चा तालुका चंद्रपूर च्या वतीने वाढीव वीज बिल कमी करून तसेच मागील तीन महिन्यांचे वीज बिल माफ करण्याबाबत निवेदन सादर.

डॉ.कुणाल खेमणार जिल्हाधिकारी चंद्रपूर, माननीय सुनील देशपांडे मुख्य अभियंता महावितरण कंपनी यांची भेट घेऊन दिले निवेदन.
Bhairav Diwase.   June 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोना विषाणूच्या तसेच लाकडाऊन परिस्थितीुळे लोकांचे रोजगार व काम धंदे डब्धाईस आले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसून लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. अश्यातच महावितरण कंपनीने घरगुती वीज ग्राहकांना मोठ्या रकमेचे बिल दिलेले आहे.त्या संदर्भात आज दि.30/06/2020.ला भारतीय जनता यवा मोर्चा तालुका चंद्रपूर च्या वतीने माजी अर्थमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी पालक मंत्री जिल्हा चंद्रपूर यांच्या कार्यालयात निवेदन देऊन.मा सुधीरभाऊ सोबत फोनद्वारे संपर्क साधला असता भाऊंनी तत्काळ. माननीय नितीनजी राऊत ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने पत्र बनवून या निवेदनाची तत्काळ दखल घेतली तसेच. माननीय डॉ.कुणाल खेमणार (जिल्हाधिकारी चंद्रपूर ) माननीय सुनील देशपांडे ( मुख्य अभियंता महावितरण कंपनी ) यांची भेट घेऊन निवेदन देऊन वीज बिल कमी करून माफ करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
 निवेदन देता वेळी श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चंद्रपू, श्री अशोक पाटील तालुका उपाध्यक्ष भा.ज.पा.युवा मोर्चा चंद्रपूर, श्री.आशिष वाढई सचिव भा.ज.पा.युवा मोर्चा चंद्रपूर, श्री.अर्जुन नागरकर हे होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने