सावली तालुक्यातील कवठी येथे विज पडून दोन्ही बैलाचा मृत्यु.

बैलावर विज पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.
Bhairav Diwase.   June 30, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील कवठी येथील कमलाकर बट्टे यांच्या दोन्ही बैलावर विज पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.कमलाकर बट्टे यांनी आपले दोन्ही बैल नेहमी प्रमाणे आपल्या आंगणातील झाडाला बांधून ठेवले होते.अचानक विज कोसळल्यामुळे दोन्ही बैलाचा मृत्यु झाला आहे.समोर शेतीची कामे असतांना जीवापाडाची जोडी गेल्याने शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.हंगामाचे दिवस असल्याने नविन बैलजोडी कुठून मिळणार? शेती नाही झाली तर कुटुंबाचे पोट कसे भरणार? अशा अनेक प्रश्न त्या शेतकऱ्यांच्या समोर येत आहेत. कवठी येथे कमलाकर रूमाजी बट्टे यांच्या बैलजाेडीवर विज पडल्यामुळे दाेनही बैल मरन पावले आता त्यांची शेती करणे कठीन झाले आहे, त्यांचा लाखाे रूपयांचा नुकसान झालेली आहे तरी शासनाने त्वरीत नुसकान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील लोक करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने