चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होतील. व त्यांच्या हाताला काम लागेल. त्यासाठी श्री राम सेना द्वारे कलेक्टर ऑफिस ला निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयातील जे काही परप्रांतीय युवक आपल्या आपल्या राज्यात परत गेले आहेत. उदा. सैनिक स्कूल, बिल्ट सिक्युरिटी, CTPS, WCL ठेकेदारी पद्धती, अश्या खूप साऱ्या ठिकाणावर जिथे जिथे रोजगार उपलब्ध झालेला आहे. अशा प्रत्येक ठिकाणी जिल्ह्मामधील स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा. म्हणजे आपल्या जिल्हातील स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार व त्यांचा जगण्याचे मार्ग सोपे सुद्धा होतील. या साठी तुम्ही लक्ष वेधले तर आपल्या जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होतील. व त्यांच्या हाताला काम लागेल. अशी मागणी विनंती द्वारे कलेक्टर ऑफिस ला निवेदन देऊन श्री संदिप श्रीहरी पोडे (श्री राम सेना जिल्हा उपाध्यक्ष )यांनी केलेली आहे. निवेदन देताना प्रामुख्याने उपास्थित गर्दी न करता श्री प्रीतम पाटणकर, श्री देवा चौधरी(भगवा nsp ग्रुप राजुरा तालुका अध्यक्ष ) (श्री राम सेना पदाधिकारी ) यांची उपस्थित होते.