1 जूलै रोजी चंद्रपूर तुकूम व मूल तालुक्यात सुशी दाबगाव गावात प्रत्येकी एक बाधित.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 44

एकूण बाधितांची संख्या 98;

54 बाधित कोरोना मुक्त
Bhairav Diwase.    July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 1 जुलै रोजी 2 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या 98 झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये उपचार घेणारे कोरोना बाधित 44 आहेत. तर आत्तापर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 54 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील सुशी गावामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण पुढे आला आहे. नवी दिल्ली वरून परत आलेल्या 28 वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.तर दुसरा 30 वर्षीय युवक तुकूम परिसरातील असून वाशिम येथून आला आहे. श्वसनाचा आजार जाणवत(आयएलआय ) असल्यामुळे हा युवक रुग्णालयात दाखल झाला होता. दोन्ही बाधिताची प्रकृती स्थिर आहे.

तत्पुर्वी, मंगळवारी जिल्ह्यातील राजुरा शहरातील जवाहर नगर येथील वीस वर्षीय युवक औरंगाबाद येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. 29 जून रोजी या युवकाचा स्वॅब घेण्यात आला. 30 जून रोजी नमुना पॉझिटिव्ह आला.

24 कंटेनमेंट झोन बंद; सध्या 14 कंटेनमेंट झोन कार्यरत:

जिल्ह्यात एकूण 38 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी, 24 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. 14 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे. तर एक कंटेनमेंट झोन सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य तपासणी:

आजपर्यंत एकूण 38 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 62 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 57 नमुने निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह तर चार नमुने प्रतीक्षेत आहे.कंटेनमेंट झोनमधील सर्व आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब घेण्यात येत आहे. कॅच दि कोरोना व्हायरस या मोहिमेअंतर्गत एकूण 21 बाधित आढळले आहे.

स्व-मुल्यांकन (सेल्फ असेसमेंट), ब्लूटूथ निकटता (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी), अंदाज तसेच ज्या भागामध्ये कोरोना संशयित बाधित मिळू शकतात अशी शक्यता आहे, त्या ठिकाणची तपासणी (फोरकास्ट, इमर्जिंग हॉटस्पॉट) विषय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे. स्व मुल्यांकनाद्वारे (सेल्फ असेसमेंट) 181 नागरिकांशी संपर्क केलेला आहे. यापैकी, 34 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 34 नागरिकांपैकी चार निगेटिव्ह, 30 अहवाल प्रतीक्षेत आहे. ब्लूटूथ निकटताद्वारे (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी) 139 नागरिकांशी संपर्क केलेला असून 109 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 109 नागरिकांपैकी 10 पॉझिटिव्ह, 93 निगेटिव्ह तर 6 नमुने प्रतीक्षेत आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणात आरोग्य सेतू अंदाज (फॉरकास्ट)तसेच इमर्जिंग हॉटस्पॉट अर्थात ज्या भागामध्ये कोरोना संशयित बाधित मिळू शकतात अशी शक्यता आहे, त्या ठिकाणी 66 गावांमध्ये 99 पर्यवेक्षक व 906 पथकांद्वारे तपासणी करण्यात आली आहे.

या तपासणी अंतर्गत 45 हजार 970 घरे, 2 लाख 12 हजार 267 लोकसंख्येच्या माध्यमातून 30 हजार 410 दुर्धर आजार (कोमॉरबीडीटी) असणाऱ्या व्यक्तींना शोधण्यात आलेले आहे. 166 आयएलआयचे रुग्ण शोधण्यात आले असून 153 स्वॅब घेण्यात आले आहे.

कोविड-19 संक्रमित 98 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -6, हरियाणा (गुडगाव)-2, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-8, नागपूर-3, अकोला-2, मुंबई-14, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -5, औरंगाबाद -4,वाशिम-1, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-7, संपर्कातील व्यक्ती – 28 आहेत.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-7, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा दोन, सिंदेवाही दोन, मुल चार, ब्रह्मपुरी 16, नागभीड चार, वरोरा पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर चार, वरोरा 9, राजुरा तीन, मुल एक, भद्रावती चार, ब्रह्मपुरी-11, कोरपणा, नागभिड, गडचांदूर प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ तीन, बालाजी वार्ड दोन, भिवापूर वार्ड एक , शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, लुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक,तुकूम एक बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 98 वर गेली आहे.

जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 4 हजार 898 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 98 नमुने पॉझिटिव्ह, 4 हजार 167 नमुने निगेटिव्ह, 600 नमुने प्रतीक्षेत तर 33 नमुने अनिर्नयीत आहेत.

जिल्ह्यातील अलगीकरणा विषयक माहिती:

जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 868 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 187 नागरिक,तालुकास्तरावर 295 नागरिक तर, जिल्हास्तरावर 386 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 83 हजार 906 नागरिक दाखल झाले आहेत. 81 हजार 200 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 2 हजार 706 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित) आणि 1 जूलै (एकूण दोन बाधित)अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 98 झाले आहेत. आतापर्यत 54 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 98 पैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 44 आहे.