तरुण वर्ग एक आदर्श ठेवत विविध प्रकारचे वृक्ष लावून त्यांचा वाढदिवस साजरा.
Bhairav Diwase. July 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- आज दि. 05 जुलै ला ना. श्री. बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. प्रहार संघटनेच्या माध्यमातून गावातील तसेच तालुक्यातील सर्व तरुण मंडळी विविध माध्यमातून सामाजिक कार्य करताना दिसत आहे. सर्व तरुणांचे गळ्यातील ताईत, सर्वांचे लाडके, सर्वांचे प्रेरणास्थान असलेले ना. श्री. बच्चूभाऊ यांचं आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने विविध गावातील तरुण वर्ग एक आदर्श ठेवत विविध प्रकारचे वृक्ष लावून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून रैयतवारी (जांब) येथील युवकांनी सुध्या विविध प्रकारच्या जवळपास 100 वृक्षांची लागवड आज गावात केली. बच्चूभाऊ यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये श्री. धनराज कोहळे, श्री. श्रीकृष्ण बोदलकर, श्री. मारोती पिपरे, श्री. रेवन घेर, श्री. नवनाथ वासेकर, श्री. सुधाकर कोहळे तसेच इतर युवकांनी यामध्ये सहकार्य केले.