वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा.
Bhairav Diwase. July 05, 2020
सावली:- सावली तालुक्यातील विविध ठिकाणी मा. बच्चू भाऊ कडू (ऊर्जामंत्री, शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
आज दिनांक ०५/०७/२०२० रोजी मा.नामदार बच्चू कडू राज्यमंत्री यांचा वाढदिवस असून सर्वत्र चाहत्या वर्गाकडून त्यांचा वाढदिवस विविध प्रकारे साजरा करण्यात येत असून सवाली तालुक्यातील जिबगांव ,साखरी, लोंढोली, हरांबा, उपरी, जांब, रैतवारी, साखरी, उसेगांव ,येथील तरुण प्रेमी चाहत्यांनी पर्यावरण संवर्धनाचे संदेश देत परिसरात अनोखी छाप सोडली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राकेश एम गोलेपल्लीवार, सुनील किनेकार, आदित्य संगीडवार नलुरवार जिबगांव, देवा बावणे, आशिष भांडेकर, महादेव मडावी साखरी, शिवनाथ खोबे, उपरी धनराज कोहळे रैतवारी, महेश नेलरवार, उमेश वरगंटीवार, फिरोज खोब्रागडे, विलास कुंभरे, सुरेश कन्नमवार कोडेखल याचे सह जिबगांव परीसरात वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.