वनविभागाचा मनमानी कारभार:- गजू गुळधे उपसरपंच

Bhairav Diwase
0
शेतकर्यांच्या शेतावर वन विभागाची कारवाही सुरु असतांना भारतीय जनता पार्टिच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली व होणारे अन्याय थांबवावे असे सांगण्यात आले.
Bhairav Diwase.    July 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावातील आदिवासी लोकांनी  आपल्या पुर्वजापासुन (दोन, तीन पिढ्यापासुन) जंगलालगत असलेली अतिक्रमीत जमीनीमध्ये उत्पन्न घेवुन आजपर्यंत आपले कुंटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते. शासनाकडुन त्या जमीनीचा पट्टा मिळावा म्हणुन संबधीत कार्यलयात बर्याच वर्षापासुन त्यांचा प्रस्ताव देखील प्रलंबीत असुन देखील व शासकीय कार्यालयाकडुन अतिक्रमण धारकांना कोणत्याही प्रकारची सुचना न देता कोलारा, करबडा, विहीरगाव, बरोबरच अन्य गावातील आदिवासी, गरजु अतिक्रमण धारकाची शेती मध्ये जे सी बी मशीनचा वापर करुन उध्वस्त करुन गरीब शेतकर्यावर वनविभागाने अन्याय केल्याचा आरोप सातारा येथील उपसरपंच गजू गुळधे यांनी केला आहे.

             याबाबत शेतकर्यांच्या शेतावर वन विभागाची कारवाही सुरु असतांना भारतीय जनता पार्टिच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली व होणारे अन्याय थांबवावे असे सांगण्यात आले. तेव्हा मासळ जि .प प्रमुख प्रविणजी गणोरकर, पं स प्रमुख गजु गुळधे, अरविंद बावनकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)