चंद्रपूर-गडचिरोली महामार्गाच्या रस्त्यांची लागली वाट.

Bhairav Diwase
संबंधित विभागाने याकडे जातीने लक्ष पुरवून पर्यायी मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी सावलीकर करत आहे.
Bhairav Diwase.    July 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- शहरातून मागील दोन महिन्यापासून राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरण बांधकाम सुरू आहे. सध्या स्थितीत महामार्गाची एक बाजू पूर्णत्वास आली आहे. तर रहदारी करिता सदर मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. वाहतुकीकरिता पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली मात्र आत्ता झालेल्या पावसामुळे सावली शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. महामार्गाचे मजबुतीकरण व्हावे या केंद्र सरकारच्या उद्दात्त हेतूने 
शहरातीलण करण्यात येत आहे. चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर सावली शहर असल्याने शहरातील जुना मार्ग तोडून नवीन चार पदरी मार्गाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असले तरी मात्र पर्यायी मार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सदर मार्ग अपघातास आमंत्रण देत असून आत्तापर्यंत पर्यायी मार्गावर लहान-मोठे अपघात सुद्धा झालेले आहेत.
 सध्या पावसाळा सुरू असल्याने पर्यायी मार्ग चिखलमय झालेला असून रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. संबंधित कंत्राटदाराने पर्यायी मार्गाची व्यवस्था करताना पक्के खडीकरण करणे गरजेचे होते मात्र पक्के खडीकरण न करता माती टाकून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला त्यामुळे पहिल्याच पावसात सदर मार्ग चिखलमय होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत.  याकडे मात्र संबंधित विभाग व कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. सदर मार्गावरून प्रवास करताना एखाद्याचा जीव केल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल सावलीकर करीत आहेत. संबंधित विभागाने याकडे जातीने लक्ष पुरवून पर्यायी मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.