मृतक महिलेच्या दोन्ही मुलांना कु. मोनिका आणि चि. अमन यांना प्रत्येकी 2-2 लाख रुपयांचे अनुदान आज आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे हस्ते चेक ने प्रदान.
कोरपना:- राजुरा तालुक्यातील भुरकुंडा भेंडवी येथे संतोष आलाम यांच्या शेतात सुनंदा सुधाकर बावणे (३६) या शेतकामासाठी गेलेल्या होत्या. एकाएकी विज कोसळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रहिवासी असलेल्या मृतकाला एक मुलगा व एक मुलगी आहे. मृतक सुनंदा बावणे या विधवा होत्या व त्यांचा कुटूंबाचा भार हा त्यांच्यावरचं होता.
आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या योजनेतून मृतक सुनंदा सुधाकर बावणे यांना तत्काळ मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
त्यानुसार मृतक महिलेच्या दोन्ही मुलांना कु. मोनिका आणि चि. अमन यांना प्रत्येकी 2-2 लाख रुपयांचे अनुदान आज आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे हस्ते चेक ने प्रदान करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विट्ठलराव थीपे,नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम,गटनेता तथा सभापती विक्रम येरणे,बिबीचे उपसरपंच प्रा.आशिष देरकर, सभापती सौ.जयश्री ताकसांडे, शहर काँग्रेस अध्यक्ष रोहीत शिंगाडे, माजी सरपंच शिवकुमार राठी नगरसेवक राहूल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना ताई वांढरे प्रा.डॉ.हेमचंद दुधगवळी, अहेमद भाई, शैलेश लोखंडे, कोवन काटकर, देवीदास मून, रुपेश चुदरी, आशीष वांढरे, राहूल ताकसांडे रामचंद्र सोनटक्के तलाठी गेडाम सह इतरांची प्रामुख्याने उपस्थीती होती.