ग्रामपंचायत बेंबाळ ता मुल येथे वृक्षारोपण.

कु अल्का आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांच्या हस्ते वृक्षारोपण.
 Bhairav Diwase.    July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात ५० कोटी वॄक्षलागवडीचा संकल्प करीत हरित महाराष्ट्राची संकल्पना राबविणारे व महाराष्ट्रात विक्रमी वॄक्षलागवड करनारे महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आज १ जुलै रोजी चंद्रपुर जिल्ह्यात वॄक्षारोपण करण्यात येत आहे. 

त्या अनुशंगाने ग्रामपंचायत बेंबाळ ता मुल येथे कु अल्का आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी श्री चंदूभाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मुल, श्री घनश्यामभाऊ जुमनाके उपसभापती पंचायत समिती मुल, करुणाताई उराडे सरपंच बेंबाळ, मुन्ना कोटगले उपसरपंच, गुरुदास जी राऊत अध्यक्ष तं.मु.स, श्री विशाल कंत्रोजवार अध्यक्ष शा व्य स, ऋषी करेवार सदस्य ग्रा पं, किशोर कुमार मेश्राम ग्राम विस्तार अधिकारी, सौ कविता केशव रामेवार उपाध्यक्ष शा व्य स, नवनाथ जी वाढई, सुधाकर गोहणे, गोविंदा कोमावर रोजगार सेवक, कमलाकर लोणारे, संतोष बोरकुटे, गौरव मांदाडे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस व इतर गावकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या