Top News

श्री राहुलभाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी केमारा- देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात केले वृक्षारोपण.

महाराष्ट्र कृषी दिनाच्या व आ. डॉ रामदासी आंबटकर आमदार तथा महामंत्री भाजपा महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून.

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हरित महाराष्ट्राचा संकल्प करून मागील सरकारच्‍या कार्यकाळात तीन वर्षात विक्रमी ५० कोटी वृक्ष लागवड.
Bhairav Diwase.    July 01, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- या वसुंधरेने आपल्‍याला भरभरून दिले आहे तिला अल्‍पसे देण्‍याचा प्रयत्‍न करणे म्‍हणजे वृक्ष लागवड करणे आहे. वृक्ष लावणे हे ईश्‍वरीय कार्य आहे. गेल्‍या 5 वर्षात राज्‍यातील जनता, शासकीय व निमशासकीय कार्यालये, धार्मीक व सामाजिक संस्‍था आदी घटकांच्‍या सहकार्याने वृक्ष लागवडीची मोहीम राज्‍यभर राबविली.

हरीत महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबविण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍यात तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवड करण्‍याचा निर्धार जाहीर केला होता. सन 2016 मध्‍ये 1 जुलै 2016 रोजी एकाच दिवशी 2 कोटी वृक्षलागवड करण्‍याचे त्‍यांनी जाहीर केले होते. वृक्षारोपणाच्‍या या मोहीमेला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्‍यात 2 कोटी 83 लक्ष इतकी वृक्षलागवड करण्‍यात आली. त्‍यानंतर 2017 मध्‍ये 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्षलागवडीचा संकल्‍प करण्‍यात आला होता. यावेळी सुध्‍दा 5 कोटी 43 लक्ष झाडे राज्‍यात लावण्‍यात आली. सन 2018 मध्‍ये 1 जुलै ते 30 जुलै 13 कोटी वृक्षलागवड करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला होता. या संकल्‍पाच्‍या पुर्तेतेसाठी सुध्‍दा जनतेचा लक्षणीय सहभाग लाभला व राज्‍यात 15 कोटी 88 लक्ष वृक्षलागवड करण्‍यात आली. या विक्रमी वृक्षलागवडीची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्‍दा मन की बात या कार्यक्रमात या मोहीमेचे कौतुक केले.

राज्याचे माजी वनेमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हरित महाराष्ट्राचा संकल्प करून मागील सरकारच्‍या कार्यकाळात तीन वर्षात विक्रमी ५० कोटी वृक्ष लागवड करून हिरवेगार महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.

मागील सरकारच्‍या कार्यकाळात तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प करत हरीत महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबविणारे व राज्‍यात विक्रमी वृक्ष लागवड करणारे राज्‍याचे माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयात वृक्षारोपण करण्‍यात आले. 

श्री मा. आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र 50 कोटी वृक्षलागवड राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कृषी दिनाच्या व आ. डॉ रामदासी आंबटकर आमदार तथा महामंत्री भाजपा महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री राहुलभाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी केमारा- देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात चेक आष्टा, आष्टा, बोर्डा दिक्षित, डोंगरहळदी, आंबेधानोरा, सातारा कोमटी, उमरी पोतदार, घनोटी तुकुम येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यांच्यासोबत अनुप श्रीकोंडावार, चंद्रशेखर झगडकर, भैरव दिवसे उपस्थित होते. 

     चेक आष्टा येथील ग्रामपंचायत मध्ये वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी उपस्थित श्री जयंत भाऊ पिंपळशेंडे सरपंच ग्रामपंचायत चेक आष्टा, श्री अमित वाढई, श्री भाऊजी गेडाम ग्रा.प शिपाई, आदी उपस्थित होते.

     आष्टा येथील ग्रामपंचायत मध्ये वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी श्री. हरीषजी ढवस सरपंच ग्रामपंचायत आष्टा, निखारे साहेब ग्रामसेवक, ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी, गावकरी मंडळी उपस्थित होते.

      बोर्डा दिक्षित येथील जि. प शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी केशव गेलकीवार बुथ प्रमुख व गावातील नागरिक उपस्थित होते.

     डोंगरहळदी येथील घट माऊली जवळ वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी जर्नाधन लेनगुरे भाजपा गाव प्रमुख, दुर्वास कन्नाके, श्री साखलवार आदी उपस्थित होते.

    आंबेधारोना येथील नवीन ग्रामपंचायत समोर वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी सिताराम मडावी सरपंच, तुळसीदास चौधरी, सौ छायाताई जगनवार, नंदकिशोर जुमनाके आदी उपस्थित होते.

     सातारा कोमटी येथील जि. प शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी गावातील नागरिक व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

     उमरी पोतदार येथील ग्रामपंचायत मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी श्री मनोज मुल्कलवार आदी उपस्थित होते.

     घनोटी तुकुम येथील गोसावी मंदीरा समोर वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी लक्ष्मण गव्हारे, संतोष कुंभरे, वैभव कामटकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने