जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यातील शिवसेना बळकट.
Bhairav Diwase. July 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- शिवसेना नेते नगरसेवक राजू डोहे आणि माजी उप-जिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या मार्गदर्शनात पाचगाव येथे विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला.
मागील काही दिवसात जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यातील शिवसेना बळकट होताना पाहायला मिळत आहे. राजुरा तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत समझल्या जाणाऱ्या पाचगाव येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण नुलावार, सामाजिक कार्यकर्त्या सौ कलावती इंदूरवार, सौ शशिकला वाकुलकर यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला.
पाचगाव-आर्वी क्षेत्रातील मुख्य ग्रामपंचायत असलेल्या पाचगाव येथे विद्यमान पंचायत सदस्या या भाजपच्या असून प्रवेशकर्त्या महिला त्यांच्या समर्थक असल्याचे बोलले जाते.
याप्रसंगी शिवसेनेचे नेते निलेश गंपावार, पाचगावचे शाखाप्रमुख मनोज कुरवटकर, युवाशाखा प्रमुख सुनील गौरकार, संदीप घ्यार, अरुण नुलावार, प्रशांत भेंडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.