पोंभुर्णा येथे १४ जुलैला श्याम प्रसाद मुखर्जी वाचनालय आयोजित बैठकीत ते बोलत होते.
Bhairav Diwase. July 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पक्षाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी जनतेची सेवा केली पाहिजे. आज जगात सर्वात मोठा पक्ष भाजप आहे पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे आज विज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान वापरून जिल्ह्याचा विकास घडवून आणायचा आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्याकरिता सदैव तत्पर असले पाहिजे भाजप हा कार्यकर्ता घडवणारा पेक्षा आहे असे मत भाजपची चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले. पोंभुर्णा येथे १४ जुलैला श्याम प्रसाद मुखर्जी वाचनालय आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी भाजप प्रदेश सदस्य हरी शर्मा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरटींवार, पंचायत समिती सभापती अलकाताई आत्राम उपसभापती ज्योती ताई बुरांडे जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, नगराध्यक्ष श्वेता वनकर, उपनगराध्यक्ष रजिया कुरेशी, आष्टाचे सरपंच हरीश ढवस, तालुका महामंत्री ईश्वर नैताम नगरसेवक अजित मंगळगिरीवार मंचावर उपस्थित होते.
भोंगळे म्हणाले मे महिन्यात नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिले पर्व संपले सरकारी कामगिरी जनतेपर्यंत संपर्क अभियानातून पोहचवायची आहे संघटनेला प्राधान्य द्या संघटनेचा विस्तार करा पूर्णा तालुक्यात आदर्श संघटना निर्माण केले पाहिजेजनतेमध्ये पक्षाबद्दल विश्वास निर्माण करा सुधीर भाऊंचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे पूर्ण जिल्ह्यात एक आदर्श तालुका निर्माण करा असे ते म्हणाले.
यावेळी हरिष शर्मा अलकाताई आत्राम संजय गजपुरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे हरी शर्मा संजय गजपुरे यांना शाल श्रीफळ देऊनसन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व नगरसेवक तालुक्यातील सरपंच उपसरपंच आजी-माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते संचालन तथा आभारप्रदर्शन युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजय मस्के यांनी केले.