Top News

चंद्रपूर जिल्ह्याला २०० युनिट विज मोफत द्या आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपाल यांना निवेदन.


नागपूर येथे भेट घेत केली सविस्तर चर्चा.
Bhairav Diwase.    July 28, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याला विज उत्पादक जिल्हा म्हणून विशेष दर्जा देत येथील नागरिकांना घरगुती वापरातील २०० युनिट पर्यंतची विज मोफत देण्यात यावी या करिता आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु असून सदर मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान आज सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नागपुरात असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले. यावेळी आ. जोरगेवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याशी सदर विषयावर सविस्तर चर्चा केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने