Top News

अध्यक्षपद शोभेची बाब नाही तर पक्षातील व्यवस्था व जवाबदारी:- देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

१७ जुलै ला भाजपाचे आंदोलन. वरोरा तालुका आढावा बैठकीत घोषणा.
Bhairav Diwase.    July 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे जिल्हा चंद्रपूर
वरोरा:- सामान्य कार्यकर्ता कोणती उंची गाठू शकतो, याची प्रचिती भारतीय जनता पक्षात आली. वार्ड अध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष हा प्रवास झाला. आता पक्ष मजबूत करायचा आहे.जो काम करेल त्यालाच आता पदं दिली जातील. मला मिळालेले जिल्हाअध्यक्ष पद शोभेची बाब नाही तर ती पक्षातील व्यवस्था व जवाबदारी आहे. असे प्रतिपादन नवनियुक्त भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. ते वरोरा येथे मंगळवार (१४ जुलै)ला आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी त्यानी १७ जुलैला जिल्ह्यातील सर्व बूथवर एकाच दिवशी विविध मागण्या घेऊन आंदोलन करण्याची घोषणा केली.

      यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय राऊत,हरीश शर्मा,महामंत्री संजय गजपुरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे,प्रशांत विघ्नेश्वर,बाबा भागडे,नगराध्यक्ष अहतेशाम अली,रवी कष्ठी, ओमप्रकाश मांडवकर,प्रीती कातोरे,राजू गायकवाड यांची उपस्थिती होती.
  
     भोंगळे म्हणाले,कार्यकर्ता संघटनेचा आत्मा आहे. काँग्रेसमुक्त जिल्हा आपण केला पण राजकारणातील बदलत्या समिकरणांमुळे आज आवाहन मोठे आहे.प्रत्येक निवडणूक स्वबळावर आता जिंकायची आहे.संपर्क अभियान च्या माध्यमातून जनतेचे प्रश्न समजून घ्या.भाजपा पक्ष आपला वाटावा म्हणून निरंतर सेवारत रहा.गरिबांना केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्य केले,कोरोनाच्या संकटाला संधीत परिवर्तित करून आत्मनिर्भर भारत चा संकल्प त्यांनी केला. आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्यात सरकार नसतानाही पालकत्व स्वीकारून सर्वस्तरावर जनहितार्थ उपक्रम राबविले हे सर्व कार्य जनतेपर्यंत पोहोचवा ,त्याच वेळी त्यांची माहिती त्यांना भविष्यात सहकार्य करण्याच्या हेतूने दिलेल्या फॉर्ममध्ये भरून घ्या,असे आवाहनही त्यांनी केले.कोरोनाच्या संकटात भाजपा जनतेच्या सेवेत आहे,पण राज्य शासन निष्ठुरपणे वागत आहे.अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत.म्हणून अनेक मागण्या घेऊन भाजपा १७ जुलैला सर्व बूथवर आंदोलन करेल,अशी घोषणा त्यांनी केली.सम्पर्क अभियान २० जुलै पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
     यावेळी भोंगळे यांनी विस्तृत चर्चा करून कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.याप्रसंगी भाजप नेते विजय राऊत,देवराव भोंगळे,हरीश शर्मा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश मांडवकर यांनी केले तर रवी कष्ठी यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने