Top News

प्रहार च्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना मिळणार हक्काचा सातबारा लवकरच होणार 300 शेतकऱ्यांना वाटप प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या प्रयत्नांना यश.

अधिकाऱ्याशी चर्चा करून शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय प्रहार सहन करणार नाही आणि शेतकर्यांचे नुकसान होऊ देनार नाही असा इशारा प्रहार ने दिला.
Bhairav Diwase.    July 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- ताडोबा बफर झोन मधील शेतकरी वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करत होते परंतु वनविभागाने त्याची शेतीतील उभ्या पिकावर ट्रकर चालून शेतीचे नुकसान केले हे माहिती प्रहार सेवक शेरखान पठाण। याना माहिती होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथील अधिकाऱ्याशी चर्चा करून शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय प्रहार सहन करणार नाही आणि शेतकर्यांचे नुकसान होऊ देनार नाही असा इशारा प्रहार ने दिला. तात्काळ जिल्हाधिकारी व वनधिकारी यांच्या शी बैठक लावून ना.बच्चूभाऊ यांच्या मार्गदर्शनात चर्चा करू व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे तेथील शेतकऱ्यांना अस्वासन दिले. जिल्हाधिकारी यांच्या शी बैठक लावून चर्चा करण्यात आली त्या बैठकीत किटाडी या गावातील 300 शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा सातबारा लवकरच त्यांना दिला जाईल असे अस्वासन जिल्हाधिकारी यांनी प्रहार सेवक शेरखान पठाण याना दिले 
    प्रहार सेवक शेरखान पठाण यांचे आभार शेतकऱ्यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने