Top News

घनोटी नं १ येथे एका शेतकऱ्यावर बिबट्या ने केला हल्ला.

हल्ल्यात अंतोष बावणे हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे.
Bhairav Diwase.    July 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पावसाळा चालू झाल्यामुळे शेतकरी बंधू आपल्या शेतात रोवन करतात. अंतोष हरी बावणे हे सकाळी च्या सुमारास शेतातील पाणी मारण्यासाठी गेले असता. पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्या शेतकऱ्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात संतोष बावणे हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे. कालपासून बिबट्या या परिसरात वावरत होता. गावक-यांनी ही बाब वनविभागाला कळविली.  काल वन विभागाच्या पथकाने त्या क्षेत्रामध्ये पाहणी केली असता त्यांना बिबट्या मिळाला नाही. परंतु आज अचानक त्या बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने