घुगुस जवळ सिमेंट कंपनी चा क्वार्टर मध्ये एका कामगाराची ची गळफास लावून केली आत्महत्या.

Bhairav Diwase
गोपाळ चिंच्कर नामक व्यक्ती ३१ वर्षाचा असून १० वर्षापासून  एसीसी. सिमेंट कंपनी मध्ये आपले कर्तव्य पार पाडत होता.
Bhairav Diwase.    July 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्गुस येथील एसीसी. सिमेंट कंपनी चा कामगाराने आपल्या राहत्या क्वार्टर वर घराच्या शुल्लक भांडणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची वृत्त समोर आले आहे. गोपाळ चिंच्कर नामक व्यक्ती ३१ वर्षाचा असून १० वर्षापासून  एसीसी. सिमेंट कंपनी मध्ये आपले कर्तव्य पार पाडत होता. वृत्त असे कि आपल्याच परिवारातील शुल्लक कारणावरून गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. आताही आत्महत्या करण्याचे गूढ मात्र गुलदस्त्यात आहे. हा इसम एसीसी चा क्वार्टर मधील किचन मध्ये गळफास लावून आत्माहत्या केली. आत्माहत्या करण्यापूर्वी घरी पत्नी शी भांडण झाल्याचे कळते. पत्नी व लहान मुलाला बेडरूम मध्ये बंद करून स्वतः किचन मध्ये जाऊन आत्महत्या केली.