प्रहारच्या आंदोलनाचा धसका घेत रस्ता दुरुस्तीला तात्काळ सुरवात.

प्रहार संघटना गडचांदूर ने उपविभागीय अधिकारी राष्टीय महामार्ग यांना दिले होते निवेदन.
Bhairav Diwase.    July 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- राजुरा, गडचांदूर,  कोरपना,  रुपापेठ या  रस्त्या दुरुस्ती चे काम गेल्या एक वर्षा पासून सुरु आहे. पण हे काम नित्कृष्ट दर्जाचे असून थोडा जरी पाऊस आला तरी रस्ता पूर्ण पने खराब होत आहे. यावर  विभागाचे नियंत्रण नाही या आधी या  विभागाला प्रहार तर्फे अनेक निवेदन दिले त्यावर थातूर मातूर रस्ता दुरुस्ती करून समाधान केले. तरी रस्त्याचे बारा वाजले येत्या आठ दहा दिवसांत गडचांदूर रेल्वे क्रॉसिंग ते रावी पेट्रोल पम्प पर्यन्त रस्ता त्वरित दुरुस्ती करावी व रावी पेट्रोल पंप ते समोर कोरपना पर्यन्त रस्ता लवकर दुरुस्ती करावा. अन्यता या नंतर आपल्या विभागाला कोणतीही माहिती न देता प्रहार स्टाईल ने कधी कुठेही आंदोलन करणार असे निवेदन प्रहार संघटना गडचांदूर ने उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग यांना दिले. यावर तात्काळ कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरु केले व यावेळेस रस्त्याचे काम योग्य पद्धतीने करणार अशी ग्वाही उपविभागीय अधिकारी यांनी दिली व सम्पूर्ण रस्ता डांबरी करणं करणार असल्याचे सांगितले  यावर प्रहार संघटनेचे सतिश बिडकर यांनी सांगितले की यारस्त्यावरून होणारी वाहतुक 40 ते 50 टन ओव्हर लोड होत असल्याने रस्ता खराब होत आहे अवैध वाहतूक व ओव्हर लोड वाहतुकीवर पोलीस विभागाचे पूर्ण पणे दुर्लक्ष आहे. या  सम्बंधी पोलीस विभागाला ओव्हर लोड व अवैध वाहतुकीवर कार्यवाही करण्यात यावी असे पत्र देण्यात येणार आहे. असे मत , शैलेश विरुटकर, पंकज माणूसमारे, सागर गुडेल्लीवार, विजय बानकर, अंजु शेख, योगेश सोंडवले, गणेश ठावरी, अंकित कुचंकर मयूर खान, सावन कोहळे, शाहरुख खान, यांनी केली , असे सतिश बिडकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत