Click Here...👇👇👇

पोंभूर्णा तालुक्यातील दिघोरी येथील सर्पदंशाने 35 वर्षीय युवकाचा मृत्यू.

Bhairav Diwase
पोंभूर्णा तालुक्यातील दिघोरी येथील घटना.
Bhairav Diwase.    July 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंउर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील दिघोरी गावातील एका पस्तीस वर्षीय युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. मृतकाचे नाव रामप्रभू दादाजी पोटे ( वय 35 ) आहे.

आज ( 4 जुलै रोजी ) दुपारी दोन वाजताच्या सुमारास रामप्रभू पोटे गावालगतच्या आवारात तनिस आणण्यासाठी गेला असता त्याला सर्पदंश झाला. पण सर्पदंश झाल्याची बाब रामप्रभूच्या लक्षात आली नाही. गावातील हनुमान मंदिरात आजच निवडक घरांचा काल्याचा कार्यक्रम व घरघुती जेवण होते. त्यात रामप्रभूने जेवण केलं. काही वेळाने त्याला उलटी झाली. त्यानंतर रामप्रभूला गोंडपिपरी येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रामप्रभूच्या मागे त्याची आई, पत्नी, दहा वर्षाची एक मुलगी आणि सात वर्षांचा एक मुलगा आहे. रामप्रभूच्या मृत्यूने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.