पावसाळ्यात आपल्या टीव्ही, मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घ्यावी - असे आव्हाहन शहर अध्यक्ष श्याम भा. बोबडे‌

Bhairav Diwase
पाऊस व विजा सुरू झाल्या बरोबर जनतेनी आपले टीव्ही, फ्रीज, मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू नये.
Bhairav Diwase.    July 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- काल सायंकाळ पासून चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. याच पावसाच्या कडकडाट विजामुळे अनेक जणांचे टिव्हीचे नुकसान झाले. यातच चंद्रपूर शहरातील हिवरपूरी वॉर्ड ( बालाजी वॉर्ड, पथांपुरा रोड) येथे वीजे मुळे वार्डातील तब्बल एकाच दिवशी 9 ते 10 टीव्ही उडाल्या ( पिक्चर ट्यूब खराब झाला) यात खूप लोकांचे नुकसान झाले, या मधे सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या चंद्रपूर (जिल्हा चंद्रपूर) च्या शहराध्यक्ष श्याम बोबडे यांची सुधा टीव्ही खराब झाली. 

श्याम बोबडे असे आव्हाहन करतात की पाऊस व विजा सुरू झाल्या बरोबर जनतेनी आपले टीव्ही, फ्रीज, मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू नये आणि प्लग काढून ठेवावे.