Top News

आदर्श हायस्कुल राजुरा चे सुयश.

बा.शी. प्र.मं. द्वारे गुणवंताचा सत्कार.
Bhairav Diwase.    July 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 10 वी च्या निकालात राजुरा येथील बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कूल राजुरा शाळेचा निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्कृष्ट लागला. 89 विद्यार्थ्यापैकी 88 विद्यार्थ्यांनि सुयश प्राप्त केले.
        यामध्ये प्रामुख्याने शाळेतील गुणानुक्रमे  सृष्टी किसन पेंदोर 92.80 टक्के गुण घेऊन प्रथम आली तसेच रुचिता सुभाष काळे 89.40 टक्के ,
आशिया अब्बास शेख 89.20 टक्के , तनय वी.घाटे 89 टक्के , प्रतीक्षा जयेंद्र कातकर 87 टक्के गुण घेऊन सुयश प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहरराव साबनानी , सचिव भाषकर येसेकर ,सह सचिव शंकरराव काकडे , कोशाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार ,संचालक अविनाश नीवलकर ,मधुकर जाणवे , लक्ष्मणराव खड़से , मंगला माकोडे ,आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर् , प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे,पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, वर्गशिक्षक नवनाथ बुटले ,मेघा वाढई , संतोष वडस्कर ,प्रशांत रागिट ,प्रतिभा मोरे , आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर , आदिंसह  शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे अभिनंदन केले. यावेळी प्रथम आलेल्या श्रुस्टि पेंदोर हिला स्वर्गीय राजय्या बेजंकिवार यांच्या स्म्रूति प्रित्यर्थ दोन हजार रुपये पारितोषिक प्रकाश बेजंकिवार ,कोशाध्यक्ष यांनी तर एक हजार रुपये पारितोषिक संचालक मधुकर जाणवे यांच्या तर्फे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बादल बेले यांनी तर आभार सारीपुत्र जांभूळकर् यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने