कायदा व नियमाचे पालन करुन जिवन जगावे यासाठी “पोलीस योध्दा” हा एक अभिनव उपक्रम.
Bhairav Diwase. July 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील युवा पिढीला पोलीसांसोबत काम करुन कायदा व नियमाचे पालन करुन जिवन जगावे यासाठी “पोलीस योध्दा” हा एक अभिनव उपक्रम राबविण्याची योजना तयार करण्यात आली असुन कोविड आपत्तीजन्य परीस्थितीत स्वयंसेवक तरुणांकरीता “पोलीस योध्दा” उपक्रमाचा आज दिनांक 27-07-2020 रोजी पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथील ड्रिल शेड मध्ये मा.ना.श्री.विजय वडेट़टीवार,मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुर्नवसन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांचे शुभ हस्ते उद़घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमात जिल्हाधिकारी चंद्रपुर डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ.महेश्वर रेड़डी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपुर श्री.राहुल कार्डीले,पोलीस उपअधीक्षक(गृह) श्री.शेखर देशमुख तसेच पोलीस योध्दा व पोलीस अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.