Bhairav Diwase. July 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- म.रा.शि.प.तालुका पोंभुर्णा जि.चंद्रपुर यांचे वतीने आज दिनांक 27-07-2020 ला दुपारी 12 वाजता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती )नियमावली १९८१ मधील नियम क्र.१९ (निवृत्ती वेतन ) व नियम क्र.२० (भविष्य निर्वाह निधी ) पोट नियम 2 मध्ये सुधारणा करण्यासाठी दि.१० जुलै २०२० रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेला व अधिसूचनेतील प्रस्तावित मसुद्याला तिव्र आक्षेप व हरकत घेण्यात येत आहे. यासंबंधी चे निवेदन गटशिक्षणाधिकारी पोंभुर्णा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा सहकार्यवाह दिलीप मॕकलवार, तालुकाध्यक्ष विठ्ठल राजुरकर, तालुका कार्यवाह संदिप बद्दलवार, विनोद देशमुख, प्रफुल निमरकार, ईदंल राठोड, अरुण मेदाडे आदि पदाधिकारी ऊपस्थित होते.