जिल्हा सामान्य रूग्णालयात प्लाझ्मा डोनेशनच्या माध्यमातुन आ. मुनगंटीवार यांना अभिनव पध्दतीने शुभेच्छा !.
चंद्रपूर महानगरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्मदिवस साजरा.
Bhairav Diwase. July 30, 2020
चंद्रपूर:- सतत जनकल्याणाचा विचार करत, विकासाचा ध्यास उराशी बाळगत लोकसेवा करणारे लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा जन्मदिवस सेवा दिन तसेच हे वर्ष सेवा वर्ष म्हणून साजरे करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आ. मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन प्लाझ्मा डोनेशन शिबीरासह अन्य लोकोपयोगी उपक्रम आम्ही राबवित आहोत. प्लाझ्मा डोनेशन ही संकल्पना कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. त्यामुळे या माध्यमातुन कोरोना महामारीच्या या काळात आपले योगदान देण्याचा व लोकनेते आ. मुनगंटीवार यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यांनी दाखविलेला लोकसेवेच्या मार्गावर चालत त्या माध्यमातुन भाजपा आणि जनता यांचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा चंद्रपूर महानगर (जिल्हा) अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.
दिनांक 30 जुलै रोजी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे प्लाझ्मा डोनेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन चंद्रपूरच्या महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते प्रकाश धारडे, डॉ. अनंत हजारे, यश बांगडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्लाझ्मा डोनेशन प्रक्रियेसाठी 24 तासात केंद्र सरकारकडून परवानगी प्राप्त करणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. डांगे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. श्री. संतोष जेठवानी यांनी यावेळी प्लाझ्मा डोनेशन केले. त्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. डॉ. मंगेश गुलवाडे यांनी डॉ. डांगे आणि श्री. संतोष जेठवानी यांचे आभार मानले. प्लाझ्मा डोनेशनच्या माध्यमातुन लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याच्या या उपक्रमाचे सामान्य रूग्णालय परिसरात कौतुक करण्यात येत होते.
*विवेकानंद नगर परिसरात वृक्षारोपण*
विवेकानंद नगर परिसरातील खुल्या गार्डनमध्ये गाडगेबाबा कृती समितीच्या माध्यमातुन वृक्षारोपण करत आ. मुनगंटीवार यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, नगरसेवक देवानंद वाढई, छबूताई वैरागडे, डॉ. मंगेश गुलवाडे, गाडगेबाबा कृती समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र पंडीत, सचिव अभय बोधे, श्रीमती मिराताई निले, श्री. खंगार, श्रीमती राजुरकर, शकील अहमद, श्री. पाटील, श्री. बोबडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
*मातोश्री सभागृह येथे रक्तदान शिबीर*
तुकूम परिसरातील मातोश्री सभागृह येथे रक्तदान शिबीराचे आयोजन नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या पुढाकराने करण्यात आले. रक्तदानाच्या माध्यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेविका चंद्रकला सोयाम, शिला चौहान, माया उईके, छबू वैरागडे, माजी नगरसेविका माया मांदाडे, डॉ. विद्या बांगडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
*अष्टभुजा वार्ड तसेच ओमनगर महाकाली वार्ड परिसरात संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांबाबत शिबीर*
अष्टभुजा वार्ड परिसरात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे जनधन खाते उघडण्याबाबत व नागरिकांना रेशनकार्ड उपलब्ध करण्याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात संबंधित अधिका-यांना, बँक प्रतिनिधींना आमंत्रीत करण्यात आले. नागरिकांना रेशनकार्डचे वितरण सुध्दा करण्यात आले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, मनोज सिंघवी, हेमंत सिंघवी, राम हरणे, आशा उईके, कृष्णा खंडू, राजेश कोमल्ला, रंजना उमाटे, गजानन उरकुडे यांची उपस्थिती होती. याच पध्दतीच्या शिबीराचे आयोजन युवा नेते प्रज्वलंत कडू यांनी ओममंदीर महाकाली वार्ड परिसरात आयोजित केले व त्या माध्यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
*बाबुपेठ परिसरात हनुमान मंदीरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम*
शहरातील बाबुपेठ परिसरातील हनुमान मंदीरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. पुजाअर्चा, अभिषेक आदींच्या माध्यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी यावेळी महापौर राखी कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेवक प्रदिप किरमे, अमोल नगराळे, राजेश कोमल्ला आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नगरसेवक प्रदिप किरमे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन व त्यानिमीत्ताने वृक्षारोपण करून आ. सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या.