कु श्रुती अभय उपगल्लावार या विध्यार्थीनेचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक.

Bhairav Diwase
श्री महर्षी विद्या मंदिर चंद्रपूर येथून सी बी एस ई १२.वी विज्ञान शाखेतून ९४.८०% प्राप्त.

चंद्रपूर शहराचे उपमहापौर तथा स्थायी समिती अध्यक्ष प्रभागांचे विद्यमान नगरसेवक राहुलभाऊ पावडे यांनी श्रुतीचे अभिनंदन व सत्कार केला. 
Bhairav Diwase.    July 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- नुकताच १२th CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला त्यात नगिनाबाग प्रभाग क्र ९ इथे राहणाऱ्या कु श्रुती अभय उपगल्लावार या विध्यार्थीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

  कुमारी.श्रुती अभय उपग्नलावार रा रामनगर चंद्रपूर हिने श्री महर्षी विद्या मंदिर चंद्रपूर येथून सी बी एस ई १२.वी विज्ञान शाखेतून ९४.८०% प्राप्त केले व तिने चंद्रपूर जिल्हा मधून दुसरा क्रमांक घेतला आहे तसेच २०१८. साली तिने सी बी एस ई १०.वी मध्ये पण ती ९८.४०% गुण घेऊन चंद्रपूर जिल्हा मधून प्रथम तर विदर्भामध्ये द्वितीय क्रमांकावर होती.
           त्या निमित्ताने आज चंद्रपूर शहराचे उपमहापौर तथा स्थायी समिती अध्यक्ष प्रभागांचे विद्यमान नगरसेवक राहुलभाऊ पावडे यांनी श्रुतीचे अभिनंदन व सत्कार केला. भविष्यातील शिक्षण क्षेत्रातील वाटचालीस अविरत यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
        यावेळी श्रुतीची आई, बाबा लहान भाऊ तसेच राहुल लांजेवार, सत्यम गाणर, अक्षय शेंडे, शुभम किरटकर उपस्थित होते