मृतक बालकाचे नाव सम्यक चंद्रशेखर पाटील १३ वर्ष किटाळी ( तु ) येथील रहीवासी.
Bhairav Diwase. July 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- घरी घाई गडबडीने जेवण करून गावालगतच्या नदीवरील बंधाऱ्यावर एक मुलगा सायकलने गेला होता. बंधाऱ्यावर त्यांचे मित्र सुरवातीलाच येवुन होते. त्यांना न विचारताच कपडे काढून बंधाऱ्यातील खोल पान्यात उडी मारली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला साडेअकरा वाजता किटाळी ( तु ) गावालगतच्या हत्ती गोठा बंधाऱ्यावर घडली मृतक बालकाचे नाव सम्यक चंद्रशेखर पाटील १३ वर्ष किटाळी ( तु ) येथील रहीवासी आहे.
सम्यक सकाळी आठ वाजता आईसोबत शेतावर गेला होता वडील दुसऱ्याकडे रोजंदारीने गेले होते. भूक लागली म्हणुन सम्यक शेतावरुन एकटाच घरी आला होता. काकाकडे जेवण केले अन सायकलने गावालगतच्या नदीवरील हत्ती गोठा बंधाच्यावर गेला.
पाऊसाचे दिवस सुरू असल्याने नदीला भरपूर पाणी आहे बंधाऱ्यावरून नाल्याला पाणी वाहत आहे. सम्यक ने कपडे काढून बंधाऱ्यातील खोल पान्यात उडी मारली काही वेळ पर्यत पान्यातुन वर आला नव्हता त्यामुळे बंधाऱ्यावर असलेल्या मित्राची घाबरली ते मित्र गावाकडे परतले. एक तासानंतर त्याचे प्रेत किटाळी पुलाजवळ वाहत येवुन पुलाला लटकले. पुलावर काही मुली खेळत होत्या त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेच गावकऱ्यांना सांगीतले. पोलीसांना माहिती देन्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मर्ग दाखल केला मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासनीसाठी उपजिल्हा रुग्णालय येथे आनन्यात आले. मृतक सम्यक जि.प. शाळा किटाळी ( तु ) येथे यावर्षी सातव्या वर्गात गेला होता त्याच्या मृत्यु ने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.