चंद्रपूरातील धारीवाल येथील कामगारांवर होणा-या अन्यायाची चौकशी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगार मंत्री यांचे प्रशासनाला निर्देश.

Bhairav Diwase
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर धारीवाल कंपणीच्या व्यवस्थापणाशी उपमुख्यमंत्री यांची व्हिडीओ कॉंन्फरन्सीगद्वारे बैठक, कामगार मंत्री यांचीही उपस्थिती.
Bhairav Diwase.    July 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूरातील धारीवाल कंपनीत कामगारांवर होणा-या अन्यायाविरोधात आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने आवाज उचलला आहे. मात्र आता धारीवाल कंपनीला कामगार विरोधी धोरण चांगलेच भोवणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरंस हॉलमध्ये व्हिडीओ कॉन्फरंसद्वारा धारीवाल कंपनीच्या अधिका-यांची बैठक घेतली यावेळी मुंबईहून कामगार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी धारीवाल कंपनीत कामगारांवर होणा-या अन्यायाविरोधात कार्यवाही करण्याची मागणी ना. अजित पवार यांच्याकडे केली. ना. अजित पवार यांनीही धारीवाल येथील कामगार विरोधी धोरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. कामगार मंत्री यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.