Top News

सामाजिक कार्यकर्ते उत्पल गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न.

हिरापुर येथे वृक्षारोपण व नुकत्याच  बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
Bhairav Diwase.    July 29, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात,
 राजुरा:- येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा ओबीसी चे लढवय्ये म्हणून ओळखले जाणारे उत्पल गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिरापुर येथे वृक्षारोपण व नुकत्याच  बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.
       नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उत्पल ला नेहमी काही ना काही समाजा साठी करण्याची जिद्द होती अश्यातच वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे प्रतिष्ठित नागरिक दादा पाटील गोरे होते तर उद्घाटन दिनेश पारखी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख अतिथी म्हनून केतन जुनघरे , मनोज गोरे सूरज गव्हाणे , सूरज भामरे , प्रवीण मोरे, भूषण जुनघरी, वैभव साळवे,मनोज वासाडे उपस्थित होते.
        ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजच ऋण फेडणे गरजेचे आहे त्या मुळे या प्रकारचे सामाजिक उपक्रम घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन या वेळी उत्पल गोरे यांनी केले.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज कोंडेकर,प्रविण गोरे, स्मितील गोरे , मंगेश खाडे , अतुल ठाकूर , शुभम गोरे , शुभम घटे,रक्षक लोहे,अमित लोहे,अनिकेत पारखी,स्वप्निल गोरे, निखिल देठे,साहिल घटे,  यांनी प्रयत्न केले. कार्यक्रम चे संचालन कु. सपना घटे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने