Top News

पोंभुर्णा अगरबत्ती प्रकल्पाचे उद्घाटन:- आ. मुनगंटीवार यांचा पुढाकार

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते.
Bhairav Diwase.    July 29, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- राज्याचे माजी अर्थ व मंचित चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर पोंभुर्णा येथील अगरबत्ती प्रकल्पाचे 28 जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले या प्रकल्पासाठी आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता अगरबत्ती प्रकल्प साठी राज्य शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून प्रमुख यांनी निधी प्राप्त झाला आहे

हा अगरबत्ती प्रकल्प यापुर्वी भाड्याच्या इमारतीत 21 फेब्रुवारी 2019 रोजी कार्यान्वित करण्यात आला होता त्यात 25 मशीन बसवून तात्पुरत्या स्वरूपात उत्पादन सुरू करण्यात आले होते सदर अगरबत्ती प्रकल्पातून निर्माण होणारे अगरबत्तीचे उत्पादन खरेदी करण्याची जबाबदारी आयटीसी यांनी घेण्यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आयटीच्या प्रमुखांशी चर्चा केली आयटीसी मी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानुसार आयटीसी या नामवंत कंपनीच्या "मंगलदीप" अगरबत्ती बियांचे उत्पादन येथे घेण्यात येत आहे आजपर्यंत या प्रकल्पातून 92.42 लक्ष किंमतीच्या 55 मे. टन अगरबत्तीचे उत्पादन करण्यात आले आहे आजतागायत या प्रकल्पाच्या प्रशस्त शेडवजा इमारती एकूण 75 स्वयंचलित मशीनद्वारे कच्ची अगरबत्ती उत्पादित केली जाणार आहे तसेच बसविण्यात आलेल्या आधुनिक संयंत्राद्वारे सेटिंग पॅकेजिंग ही पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे दरमहा 75 मेट्रिक टन गरबत्तीचे उत्पादन घेता येणे शक्‍य होणार आहे यातून सुमारे 200 महिला, पुरुषांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने