प्रयास शिक्षकांची फसवणूक..... दिड वर्षापासून पगार नाही...

Bhairav Diwase
महाराष्ट्र, तेलंगणा या दोन राज्यातून करोडो च्या संख्येने पैसा वसूल करून विद्यार्थी शिक्षक सुपरवाॅयजर यांची फसवणूक.
Bhairav Diwase.    July 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- जागृती सेवा संस्थान चे राज्य प्रभारी श्री महेंद्र भगवान यांनी संस्थेअंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील दिघोरी, चेक फुटाणा, नवेगाव मोरे ,घाटकूड, पोंभुर्णा व तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये आम्हाला शिकवणी वर्ग चालू करायच्या आहेत त्यासाठी आम्हाला एका शाळेत चाळीस विद्यार्थी याप्रमाणे तालुक्यातील १६५ शाळा चालू करून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये ऍडमिशन फी याप्रमाणे ६,६०० विद्यार्थ्यांचे सहा ६,६०,००० वसूल केलेत तसेच तीन महिन्यानंतर विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्यात येतील असे सांगितले मात्र दीड वर्ष उलटूनही अजून पर्यंत एकही रुपया दिलेला नाही.


तसेच प्रत्येक शिक्षकांकडून 1500 रुपये प्रमाणे 165 शिक्षकांचे 2,47,500एवढी रक्कम वसूल केली आणि तुम्हाला पाच हजार पाचशे रुपये दरमहा पगार देण्यात येईल अशी खोटी आश्वासने दिली तसेच सुपरवाॅयजर बी. ऒ. यांचे कडून सुद्धा पैसेवसुली केली परंतु दीड वर्ष उलटून गेला तरी कोणत्याही प्रकारचे पैसे आम्हाला दिले नाही

            फसवणूक करणाऱ्या महेंद्र भगवान सिडाम व वल्लभ पांडे पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी विष्णू सिडाम,  मुरलीधर कोडापे, आशिष पाल, विकास शेडमाके,  मल्लया डंकलवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा या दोन राज्यातून करोडो च्या संख्येने पैसा वसूल करून विद्यार्थी शिक्षक सुपरवाॅयजर यांची फसवणूक केलेली आहे.