कु उषा नथ्थुजी पिंपळकर रा. चेक आष्टा हि विद्यार्थिनी महाविद्यालयातून बारावी मध्ये दुसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण.

Bhairav Diwase
जनता कनिष्ठ व्यावसायिक महाविद्यालय पोंभूर्णाचे प्राचार्य पिंपळकर यांच्या हस्ते सत्कार.
Bhairav Diwase.    July 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर झाला. पोंभुर्णा स्थानिक जनता कनिष्ठ व्यावसायिक महाविद्यालय पोंभूर्णा येथील कु उषा नथ्थुजी पिंपळकर रा. चेक आष्टा हि विद्यार्थिनी महाविद्यालयातून दुसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली. तिला बारावीच्या परीक्षेमध्ये 67% मिळाले. 
    आज ग्रामपंचायत चेक आष्टा येथे जनता कनिष्ठ व्यावसायिक महाविद्यालय पोंभूर्णाचे प्राचार्य पिंपळकर सर यांच्या हस्ते कु. उषा नथ्थुजी पिंपळकर विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.  
 यावेळी भोयर सर, जयंत पिंपळशेंडे सरपंच ग्रामपंचायत चेक आष्टा, बांगरे साहेब सचिव, जगन येलके तसेच महाविद्यालयीन शिक्षकवृंद उपस्थित होते.