गौतम पाटील व्यापारी कांग्रेसचा चिमूर विधानसभा अध्यक्ष, दोन चेक बाऊन्स पोलीस कार्यवाही काही करेना.
Bhairav Diwase. July 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील मौजा वहानगांव येथिल रहिवासी असलेले शेतकरी सुधाकर आत्माराम थुटे यांनी आपला कापूस ७४क्विंटल ६५ किलो कापूस भाव रक्कम रुपये ५०००/- प्रति क्विंटलप्रमाणे दिनांक१/६/२०२० रोजी गौतम पाटील यांस विकला असून सदर मालाची एकुण रक्कम रुपये ३,७३,२५०/- (तीन लाख त्र्यहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये) झाली सदर रक्कमेपैकी ३५,०००/- (पस्तीस हजार रुपये) नगदी स्वरुपात देवून उर्वरित रक्कमेपैकी भारतीय स्टेट बँक शाखा-सावरी (बिड.) या बँकेचा धनादेश क्र. १३३९४७ नुसार रुपये १,२३,४००/- आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चंद्रपूर येथील धनादेश क्र. १०४६४७ नुसार रुपये २,००,०००/- याप्रमाणे दोन धनादेश दिले. तेंव्हा सदर शेतकऱ्यांनी बँकेत जमा केले असता पैश्या अभावी चेक वटले नाही ,वारंवार संपर्क करून ,व घरी भेट देऊनही रक्कम देत नसल्याने दिनांक १०/७/२०२० रोजी पोलीस स्टेशन शेगांव (बु.) येथे तक्रार दाखल केलेली आहे. परंतु गैरअर्जदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. गैरअर्जदार गौतम पाटील हा चिमूर विधानसभा युवक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे तेंव्हा पोलीस व प्रशासनाने कार्यवाही करून कापसाचे पैसे मिळवून देण्याची मागणी सुधाकर थुटे या शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे .
तालुक्यातील गुजगव्हाण येथील रहिवासी गौतम ठाकसेन पाटील हा परिसरातील शेतक-यांचा शेतमाल खरेदी करण्याचा व्यवसाय करत असल्याने मौजा वहानगांव येथिल रहिवासी असलेले शेतकरी सुधाकर आत्माराम थुटे यांनी आपला कापूस ७४क्विंटल ६५ किलो कापूस भाव रक्कम रुपये ५०००/- प्रति क्विंटलप्रमाणे दिनांक१/६/२०२० रोजी गौतम पाटील यांस विकला असून सदर मालाची एकुण रक्कम रुपये ३,७३,२५०/- (तीन लाख त्र्यहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये) झाली सदर रक्कमेपैकी ३५,०००/- (पस्तीस हजार रुपये) नगदी स्वरुपात देवून उर्वरित रक्कमेपैकी भारतीय स्टेट बँक शाखा-सावरी (बिड.) या बँकेचा धनादेश क्र. १३३९४७ नुसार रुपये १,२३,४००/- आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चंद्रपूर येथील धनादेश क्र. १०४६४७ नुसार रुपये २,००,०००/- याप्रमाणे दोन धनादेश दिले.सदरचे दोन्ही धनादेश सुधाकर थुटे यांनी दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. शाखा- खडसंगी येथे आपले बँक खात्यावर वटविण्यासाठी दिले असता धनादेश क्र. १३३९४७ दि. ४/७/२०२० व धनादेश क्र. १०४६४७ दि. ३/७/२०२०चे बँकेचे पत्रानुसार गैरअर्जदाराचे खात्यात पैसे नसल्याचे कारणावरुन सदर दोन्ही धनादेश परत आलेत.त्यामुळे ,वारंवार संपर्क करून ,व घरी भेट देऊनही रक्कम देत नसल्याने दिनांक१०/७/२०२० रोजी पोलीस स्टेशन शेगांव (बु.) येथे तक्रार दाखल केलेली आहे. परंतु गैरअर्जदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. गैरअर्जदार गौतम पाटील हा चिमूर विधानसभा युवक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे तेंव्हा पोलीस व प्रशासनाने कार्यवाही करून कापसाचे पैसे मिळवून देण्याची मागणी सुधाकर थुटे या शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे .
सदर शेतकरी हा शेती व्यावसायीक असल्याने कोविड-१९ च्या लाकडाऊनच्या काळात आर्थिक अडचण असल्यामुळे आणि यावर्षीचा शेती हंगाम करण्याकरीता पैशाची गरज भासल्याने सदरील कापूस हा गौतम पाटील यांना विकत दिला. गैरअर्जदार हा परिचित असल्याने आणि त्याने मला पैसे लवकरात लवकर मिळेल असे आश्वासन दिल्याने मी त्याचेकडून दोन्ही धनादेश स्विकारले.सदर दोन्ही धनादेश मी बँकेमध्ये जमा केले परंतु मला गैरअर्जदाराकडून घेणे असलेली माझी रक्कम मला अजूनही परत मिळालेली नाही. सदर कापूस माल खरेदी केल्याची पावती त्याने स्वहस्ताक्षरामध्ये लिहून दिलेली आहे आणि माझेकडून खरेदी केलेला कापुस हा पारस ला विकल्याच्या पावत्या सुध्दा पुराव्यादाखल यासोबत जोडत आहे. असे शेतकरी सुधाकर थुटे यांनी सांगितले असून आज दिनांक २९जुलै रोजी उपविभागीय अधिकारी चिमूर व उपविभागीय पोलीस अधिकारी ,चिमूर जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलीस अधीक्षक ,अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर यांना निवेदन देऊन केली आहे.
मी त्या शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तयार आहे:- गौतम पाटील
कापूस व्यवसायिक तथा चिमूर युवक विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील यांनी सांगितले की वाहणगाव येथील शेतकरी सुधाकर थुटे यांचेकडून कापूस खरेदी केले असता त्यांना 35 हजार रुपये नगदी दिलेले होते उर्वरित रक्कमेच्या चेक देण्यात आले परंतु दरम्यान काळात काही शेतकऱ्यांना मी सुध्दा आगाऊ पैसे दिले त्या शेतकऱ्यांनी नंतर पुढील पिकात पैसे देवू असे म्हटले असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली तेव्हा सुधाकर थुटे यांची उर्वरित रक्कम परत करणार असल्याचे सांगितले त्यामुळे फसवणूक करण्याचा प्रश्न च नाही"
गौतम पाटील
कापूस व्यापारी गुजगव्हान