ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी देण्यात यावी. नाना ठाकरे यांची मागणी.

शासनाने आपत्ती व्यवस्थापन मधुन ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे मौदा तालुका प्रमुख नानाभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केले.
Bhairav Diwase.    July 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरोना संक्रमणामुळे लाँकडाऊनच्या काळात ग्रामपंचायतींवर अधिकचा बोझा वाढल्यामुळे शासनाने अतिरिक्त निधी त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावी. मागील तिन महिन्यापासून सँनिटाईजर, निर्जुतीकरण करणे, मास्क वाटप करणे, स्वच्छते विषयी कामे करण्यात आले.
चौदाह वित्तआयोगातील निधी सुध्दा अपुरी पडली. शासनाच्या योग्य आदेश नुसार संरपच, सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना एक एक हजार रुपये देण्यात आले. काही ग्रामपंचायत अंतर्गत दुकाने, उद्योग, कारखाने नसल्याने विपणन क्षेत्र आहे अशा ग्रामपंचायतीना गावातील कामे करण्यास खूप अडचणी निर्माण होत आहे.या काळात कर वसुली पण होत नाही.गावातील शाळांना सँनिटाईजर करणे, पावसाळ्या मुळे मच्छर चे प्रमाण वाढले असून त्यांची फवारणी करणे असे अनेक काम करण्यास ग्रामपंचायत असमर्थ आहे. 
तरी शासनाने आपत्ती व्यवस्थापन मधुन ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे मौदा तालुका प्रमुख नानाभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केले.
कोरोना व्हायरसचा प्रभाव आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे तरी ग्रामस्थांनी नव्हे तर सर्व नागरिकांनी शासनाच्या नियमाचे पालन करून मित्र, नातेवाईक, व इतर लोकांन पासुन सामाजिक अंतर राखून कोरोना व्हायरस चा नाईनाट करुन आपल्या गावातुनच नव्हे तर आपल्या देशातून हद्दपार करायचा आहे असाही संदेश नाना ठाकरे यांनी दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने