कोहिनुर स्टेडियम येथे हलविण्यात आलेले गंजवार्ड येथील मार्केट, भाजी विक्रेते यांना गंजवार्ड येथे पूर्ववत स्थानांतरण होणार.

Bhairav Diwase
भाजी विक्रते व त्यांच्या असोसिएशन च्या वतीने मा.आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार मानले.
Bhairav Diwase.    July 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग च्या अनुशंगाने कोहिनुर स्टेडियम येथे हलविण्यात आलेले गंजवार्ड येथील मार्केट, भाजी विक्रेते यांना गंजवार्ड येथे पूर्ववत स्थानांतरण करण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी व असोसिएशन ने मा आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने सुधीरभाऊ यांनी महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखीताई कंचर्लावार व उपमहापौर तथा स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांची बैठक घेऊन गंजवार्ड भाजी विक्रेत्यांना स्थानांतरित करण्याच्या सूचना करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत मान्यता काही रक्कम घेऊन करण्याची सूचना दिल्या व त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या. त्यात काही चिल्लर विक्रेत्यांना ती रक्कम भरणे सोयीची होत नव्हती. त्या अनुषंगाने एकत्र पुन्हा गंजवार्ड समितीच्या शिष्टमंडळ आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले.
त्या अनुषंगाने सुधीरभाऊंनी पुनश्च महापौर राखी
कंचर्लावार उपमहापौर राहुल पावडे व मनपा आयुक्तांना सूचना करून ते सुद्धा रक्कम कमी करण्यासाठी सूचना केल्या, आणि कोहिनूर ग्राउंड इथे बसलेल्या बाजाराचे स्थानांतरण लवकरच करण्यासाठी सूचना केल्या, त्या नंतर लवकरचं ते बाजार आता इथे स्थानांतरीत होणार आहे, व जे काही रक्कम भाजी विक्रेत्यांना भरणे कठीण होत होती ते सुद्धा मा.आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार कमी होणार आहे, त्यामूळे भाजी विक्रते व त्यांच्या असोसिएशन च्या वतीने मा.आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार मानले आहे.