Top News

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल शहरात 9 कोटी 27 लक्ष 32 हजार 538 रु किंमतीच्या विकासकामांना मंजुरी.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाचा प्रभावी  पाठपुरावा करत त्यात यश प्राप्त केले आहे.पारितोषिकाच्या या निधीतून 9 कोटी 27 लक्ष 32 हजार 538 रु किंमतीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे मुल शहराच्या सौंदर्यात आणखी भर घातली जाणार.
Bhairav Diwase.    July 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल नगर परिषदेला स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अंतर्गत प्राप्त प्रोत्साहनपर पारितोषिकाच्या निधीतून विकासकामांसाठी 9 कोटी 27 लक्ष 32 हजार 538 रु किंमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दि. 6 जुलै रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे.


स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अंतर्गत मुल नगर परिषद तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली . या पारितोषिकासाठी रु 10 कोटी प्रोत्साहनपर निधी सदर नगर परिषदेला प्रदान करण्यात आला आहे . या निधीच्या माध्यमातून शहरातील विहिरगाव , वरढी बोडी येथील तलावाचे सौंदर्यीकरण करणे  , शहरात फाऊंटन बांधकाम व विद्युतीकरण करणे, विविध कलाकृती पुतळे उभारणे व सौंदर्यीकरण करणे , शहरात वॉल पेंटिंग करणे , ओडी परिसराचे सौंदर्यीकरण करणे , सिव्हर सक्शन कम जेटिंग मशीन खरेदी करणे , लोडर कम लेव्हलर मशीन खरेदी करणे , व्हॅक्युम एमटीयर मशीन खरेदी करणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती.


 आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाचा प्रभावी  पाठपुरावा करत त्यात यश प्राप्त केले आहे.पारितोषिकाच्या या निधीतून 9 कोटी 27 लक्ष 32 हजार 538 रु किंमतीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे मुल शहराच्या सौंदर्यात आणखी भर घातली जाणार आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने