Top News

गडचांदूर शहरात मा. राज्यमंत्री व प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस वृक्ष रोपण करून साजरा.

हा दिवस दिव्यांग स्फूर्ती दिन म्हणून साजरा करून  जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी दि.४, ५, ६ जुलै 2020 रोजी प्रत्येक प्रहार पदाधिकारी, व सेवकांनी वृक्षाचे रोपण करावे. असे आवाहन मा.बच्चूकडू यांनी केले.
Bhairav Diwase.    July 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर येथील सर्व प्रहार सेवक यांनी वृक्षारोपण करून मा नामदार बच्चू भाऊ कडू यांचा ५१ वा वाढदिवस ५१ वृक्ष लावून साजरा केला. ५ जुलै ला मा. राज्यमंत्री तथा प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस असतो व संपूर्ण राज्यात विवीध समाजोपयोगी उपक्रम राबवून तो साजरा सुध्दा केल्या जातो.
मात्र यावर्षी राज्यासह संपूर्ण देशात कोविड -19 च्या वाढत्या संसर्गा मुळे भीतीमय व दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे यावर्षी मा.बच्चूभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोठेही व कोणताही उपक्रम राबविण्यात येऊ नये. व हा दिवस दिव्यांग स्फूर्ती दिन म्हणून साजरा करून  जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी दि.४, ५, ६ जुलै 2020 रोजी प्रत्येक प्रहार पदाधिकारी, व सेवकांनी वृक्षाचे रोपण करावे. असे आवाहन मा.बच्चूकडू यांनी केले आहे त्या आवाहनाला योग्य तो प्रतिसाद देऊन प्रहार जनशक्ती पक्ष गडचांदूर च्या वतीनेे प्रहार सेवक सतिश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करून मा. बच्चूकडू यांचा वाढदिवस साजरा केला याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे सतिश बिडकर शैलेश विरुटकर पंकज माणूसमारे अरविंद वाघमारे सागर गुडेल्लीवार प्रतीक खैरे गणेश भाऊ सचिन कोंडेकर अंजु शेख मयूर खान विजय बानकर योगेश सोंडवले अनेक प्रहार सेवक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने