Click Here...👇👇👇

मुल तालुका कलाकार संघातर्फे मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय मूल यांच्यामार्फत निवेदन.

Bhairav Diwase
झाडीपट्टी नाटक, कलापथक, पथनाट्य, लग्नकार्यात सुगम संगीत या निमित्तानं सर्व कलावंत, गायन-वादन, प्रबोधन, आर्केस्ट्रा बँड लाॅकडाऊन मुळे अडचणीत.
Bhairav Diwase.    July 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मुल तालुका कलाकार संघातर्फे मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय मूल यांच्यामार्फत देण्यात आला, मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत झाडीपट्टी नाटक, कलापथक, पथनाट्य, लग्नकार्यात सुगम संगीत, गायन-वादन, प्रबोधन, आर्केस्ट्रा बँड अशा विविध प्रकारच्या कला सादर करून स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतो. यावर्षी कोरोना सारख्या  महामारी मुळे जगात थैमान माचवलेला आहे. त्यामुळे आम्ही घेतलेल्या सर्व प्रोग्राम रद्द झाले. गर्दी न करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. कलावंत हे कार्यक्रमाच्या भरोशावर आहे.त आणि कार्यक्रम नसल्याने सर्व कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
      काही काही  कलावंतांचा कला हे मुख्य व्यवसाय आहे कलेचा  भरोशावर त्यांच्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोरोना संकटामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले व पुढे होतील याची काही शाश्वती नाही. म्हणून सर्व कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात कलावंतांनी शासनाला कुठलीही मदत मागितली नाही. आता कलावंत अडचणींचा सामना करीत असल्यामुळे शासनाने कलावंतांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मुल तालुका कलाकार संघटनेच्यावतीने मा, मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन मा,  तहसीलदार तहसील कार्यालय मुल यांच्यामार्फतीने देण्यात आला. निवेदन देताना मुल  तालुका कलाकार संघटनेचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ कुकुडकर, मुकेश भाऊ गेडाम, संजय मेकर्तीवार, मंगलदास म्हशाखेत्री, सोशीत  खोबरागडे, भास्कर मेश्राम, मयुर  राशेट्टीवार व इतर सभासद उपस्थित होते.