Click Here...👇👇👇

भावी सरपंच होणाऱ्या व्यक्तीसाठी महत्वाची बातमी.

Bhairav Diwase
ग्रामपंचायत सरपंच होण्यासाठी सरकारतर्फे निवड प्रक्रिया जाहीर.
  
 ग्रामपंचायत प्रशासक होण्यासाठी काय करावे लागेल याची मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती.
Bhairav Diwase.    July 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर यापुढे प्रशासक म्हणून शासकीय अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार नसून त्याऐवजी गावातील योग्य व्यक्तीची निवड केली जाईल असा आदेश राज्यपाल यांनी पारित केला आहे.

यासंदर्भात सुधारित आदेश राज्याचे मुख्य अप्पर सचिवानी २५ जून रोजी निर्गमित केले आहे. राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर मध्ये संपत असून कोरोणामुळे उद्भवलेल्या परिस्थिती ने निवडणुका घेणे शक्य नसल्याने त्या ठिकाणी शासकीय प्रशासक नेमावा असे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले.

*ग्रामपंचायत प्रशासक निवड प्रक्रिया*

तालुक्यातील आमदार शिफारस करणार असून त्या व्यक्तीला जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणू नेमणार आहेत. तसेच त्यासाठी जिल्हा परिषद सी ई ओ नेमणूक आदेश देणार आहे.

गावातील योग्य व्यक्तीची निवड करण्यासंदर्भातला आदेश निघताच अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून बहुतांशी ठिकाणी सरपंच मंडळी आपल्या कुटुंबातीलच प्रशासक कसा नेमला जाईल याची सुद्धा तयारी करत असल्याचे चित्र असून गावातील राजकीय व्यक्ती सुद्धा यात मागे नसून सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत प्रत्येक जण प्रशासक म्हणून आपली कशी वर्णी लागेल यासाठी फिल्डिंग लावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.