Top News

भर पावसाळ्यात शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण, मोटारपंप व इंजिनने धानशेतीला पाणी.

मोटारपंप द्वारे धान पिकाला पानी करावे लागत आहे:- मधुकर राऊत शेतकरी, चिचाळा(शास्त्री) ता.चिमूर
Bhairav Diwase. July 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- शेतकरी हा जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते, ऋतूमानानुसार उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे तीन ऋतु असून उन्हाळ्यात ऊन तापत असून हिवाळ्यात थंडी तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला पाहिजे मात्र यावर्षी पावसाळ्यात पाहिजे तसा पाऊसच पडत नसल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा मनस्ताप निर्माण होतो आहे.

शेतकऱ्यांचे शेतातील सर्व काम ही पावसाळ्यातच सुरू होत असते चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अद्याप भरपूर प्रमाणांत पाऊस पडला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रोवनीची कामे अपूर्ण आहेत ज्या परिसरात थोड्या फार प्रमाणत पाऊस व सिंचनाची सोय आहे त्या ठिकाणी रोवनीची कामे सुरू झाली आहेत मात्र शंकरपूर-आंबोली परिसरात भर पावसाळ्यात शेतकऱ्यांना इंजिन, व मोटारपंप यांनी पानी करण्याची वेळ येत आहे पाणी देऊन रोवणी तर कशीबसी करून घेतली परंतु भर पावसाळ्यात कडक उन्ह तपात असल्याने रोवणी झालेल्या धान शेतीमधील पाणी पूर्ण जमिनीत जिरल्याने धान काही ठिकाणी धान मरत आहे,त्यामुळे रोवणी करणारे शेतकरी चिंतेत असून धान वाचविण्यासाठी शेतकरी इंजिन व मोटारपंप याने पाणी करत आहेत चिमूर तालुक्याती अजून ५० टक्के रोवणी अद्यापही शिल्लक असून पाऊसच नसल्याने शेतकरी मनस्ताप करीत आहेत ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी मात्र भर पावसाळ्यात धान शेतीला मोटारपंप इंजीन द्वारे पाणी करीत आहेत जे काही शेतील पाणी करीत आहेत पाणी मात्र शेतजमीनितच जिरत आहे त्यामुळे धान शेतीला भरपूर प्रमाणात पाणी लागत आहे त्यामुळे शेती करणे हे अडचणीचे झाले. असून शेती ही न पडवडण्यासारखी असल्याचे मत तरुण भारत शी बोलतांना व्यक्त केलेल आहे.


शेतकऱ्याचे मनोगत

चार दिवसांपूर्वी मी माझ्या शेतीला मोटारपंप द्वारे पाणी करून रोवणी केली तेव्हा कशेबसे शेतीत पाणी होते परंतु आत भर पावसाळ्यात उन तापत असल्याने जी धान रोवणी केली ती पण पाऊस नसल्याने वाळत आहे त्यामुळे पुन्हा मोटारपंप द्वारे धान पिकाला पानी करावे लागणार आहे. परंतु पंपाची लाईट व्यवस्थित राहत नसल्याने पाणी करण्यासाठी खूप अडचणी आहे. :- मधुकर राऊत
शेतकरी, चिचाळा(शास्त्री) ता.चिमूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने