मोहर्ली गावात झाडाला लटकलेला मृतदेह आढळल्याने खळबळ.

Bhairav Diwase
फाशी लावून आत्महत्या केल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू.
Bhairav Diwase. July 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- मोहर्ली गावातील ग्रामपंचायत पर्यटन संकुलनच्या बाजूला मोहर्ली मामा तलावा लगत एका सागाच्या झाडाला लटकलेला मृतदेह आढळल्याने मोहर्ली गावात खळबळ पसरली. काल दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी 4.00 च्या सुमारास पदमापूर वरून फिरण्यास आलेले कुलदीप केशराज पाल व त्यांच्या सोबतच्या तिघांनी मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसताच तात्काळ गावांतील पोलिस पाटील रामकृष्ण साखरकर यांना माहिती दिली.


माहिती मिळताच पोलिस पाटील रामकृष्ण साखरकर घटना स्थळी पोहचले. प्रशांत अण्णाजी निकोरे वय 32 असे मृतकाचे नाव असून तो MTDC रिसोर्ट मध्ये कामाला होता. त्याला 2 महिन्याची एक गोंडस मुलगी होती. सहा दिवस आधी त्याचे वडील मरण पावले होते. घरात दुःखाचे वातावरण होते. प्राप्त माहितीनुसार अचानक झालेल्या वडिलांच्या मृत्यूने त्याला धक्का बसला व त्याने फाशी लावून आत्महत्या केल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिस घटनास्थळी पोहचून पंचनामा केले. मृतदेहाला पोस्टमार्टम करिता चंद्रपुर शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले व पुढील तपास सुरू आहे.