प्रथम कन्यारत्न झालेल्या कुटुंबाला पाच हजार रुपयांचे धनादेश वाटप.

Bhairav Diwase
आमदार बंटी भांगडीया यांचा लोकउपयोगी उपक्रम.
Bhairav Diwase. July 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भांगडीया फाउंडेशन च्या माध्यमातून प्रथम कन्या झालेल्या लाभार्थ्यांना 5 हजार रुपये धनादेश देऊन पुढील 23 वर्षात 40 हजार रुपये लग्न कार्यासाठीची लोकोपयोगी योजना अंमलात आणली आहे.
स्व धापुदेवी गोटुलालजी भांगडीया स्मृती प्रित्यर्थ प्रथम कन्या झालेल्या लाभार्थ्यांना 5 हजार रुपयांचा धनादेश वाटप डॉ श्यामजी हटवादे यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी विलास कोराम सचिन फरकाडे, प्रशांत चिडे, सचिन बघेल, अफरोज पठाण आदी उपस्थित होते. अरुण लोहकरे, नाजीया शेख यांनी धनादेश वाटपाचे काम पाहिले. नेरी जिल्हा परिषद क्षेत्रातील 17 लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.