Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील दुध शितकरन केंद्र पूर्ण क्षमतेने चालविणे तसेच दुधाला प्रति लिटर 10 रू. अनुदान तातडीने देण्यात यावे:- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर.

दुध उत्पादकांना न्याय देण्यासाठी उपरोक्त मागणी मंजुर करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
Bhairav Diwase. July 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात शासकिय दुध डेअरी कार्यरत असुन त्यांच्याकडे 50 हजार लिटर क्षमतेचे दुध शितकरण केंद्र उपलब्ध आहे. परंतू मोठी क्षमता असुनही दुध संकलनात होत असलेल्या उपेक्षेमुळे सध्या केचळ 5 हजार लिटर दुध संकलीत होत आहे. या शासकिय दुध डेअरीत विविध विभागात 60 कर्मचारी कार्यरत आहे. ईतके मोठ्या संख्येत कर्मचारी आणि शासनाची याकरिता फार मोठी गुंतवणुक असुनही या दुध डेअरीचा पुरेपूर उपयोग होतांना दिसत नाही. येथील अधिकारी आणि कर्मचारी ढेपाळलेले आहेत. या दुध डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात दुध संकलन आणि शितकरणाची सुविधा असल्याने याच्या माध्यमातून जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात दुध खरेदी केली पाहीजे. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना व सोसायट्यांना लाभ होईल आणि जिल्ह्यातील दुधाची गरज स्थानिक पातळीवर भागविली जाऊ शकते आणि दुधही वाया जानार नाही. सध्या दुध बाहेरून मागवावे लागत आहे.
राज्यात दुध उत्पादक शेतकऱ्यांना लाॅकडाऊचा फटका बसल्याने त्यांचे दुध संकलन होऊ न शकल्यामुळे त्यांना फार मोठा आर्थिक भुर्दंड सोासावा लागला. अनेक दुध उत्पादकांनी कर्ज काढुन जनावरे खरेदी केली आहे. याशिवाय चारा आणि मनुष्यबळासाठी सुध्दा खर्च सतत सुरू असल्याने दुध उत्पादक डबघाईस आले आहे. त्यांच्या या वाईट स्थितीत त्यांना पून्हा उभारी देण्यासाठी सरकारने त्यांना प्रति लिटर 10 रू. अनुदान देण्याची मागणी करीत आहोत.
याची दखल घेऊन दुध डेअरी व्यवस्थापन कार्यक्षम करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करावी तसेच शासकिय दुध डेअरीच्या माध्यमातून संकलन करण्यात येत असलेल्या दुधाला प्रति लिटर 10 रू. अनुदान देण्याची गरज असल्याने सरकारने याची तातडीने दखल घेऊन दुध उत्पादकांना न्याय देण्यासाठी उपरोक्त मागणी मंजुर करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी अशी मागणी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने