Top News

बल्लारपूर येथील विद्युत कंपनीचा भोंगळ कारभार.

बल्लारपूर येथील विद्युत कंपनीचा भोंगळ कारभार

वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करा :- राजू झोडे
Bhairav Diwase. July 21, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील मागील चार-पाच महिन्यापासून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे बल्लारपूर येथील रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या अनेक विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासेस सुरू असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बल्लारपूर येथील नवीन सबस्टेशन मधून बल्लारपूर शहराला विद्युत पुरवठा झाल्यापासूनच ही समस्या सुरू झालेली आहे. बल्लारपूर शहराला दोन सबस्टेशन मधून विद्युत पुरवठा होतो. परंतु दोन्ही सबस्टेशन चे काम अत्यंत निकृष्ट झालेले असून त्यामुळेच विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. म्हणूनच ज्या ठिकाणाहून सुरुवातीला विद्युत पुरवठा केल्या जात होता त्याच सब स्टेशन मधून विद्युत पुरवठा पूर्ववत करावा व निकृष्ट असलेल्या सब स्टेशनची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी *उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे* व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली.

जर सदर बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही व विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर या विरोधात उलगुलान संघटनेद्वारा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी निवेदना मार्फत दिला.

निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, प्रशांत सातपुते, नरेश डोंगरे, गुरु कामठे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने